भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली ही मागणी

0

सोलापूर,दि.20: भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषीविषयक कायदे (Farm Laws) मागे घेण्याच्या केलेल्या घोषणेचे स्वागत केले आहे. याबाबत त्यांनी एक पत्रही लिहिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे मी स्वागत करतो. तसेच अशी माझी नम्र विनंती आहे की एमएसपी व इतर मुद्द्यांवर कायदा करण्याच्या मागणीवरही त्वरित निर्णय घेण्यात यावा, त्यामुळे शेतकरी बांधव आंदोलन संपवून सन्मानाने घरी परततील.

या पत्रात त्यांनी लखीमपूर खेरीची घटना लोकशाहीला लागलेला कलंक असल्याचेही लिहिले आहे. या प्रकरणाशी संबंधित मंत्र्यांवर कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर देशहिताच्या दृष्टीने किमान आधारभूत किमतीचा वैधानिक हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी सरकारने मान्य करावी. या आंदोलनात 700 शेतकरी शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही एक कोटींची भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

काय आहे C2+50% फार्मूला?

कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांवरील राष्ट्रीय आयोगाने आपल्या अहवालात शिफारस केली आहे की शेतकऱ्यांना C2+50% सूत्रानुसार किमान आधारभूत किंमत (MSP) देण्यात यावी. याचा अर्थ पिकाची एकूण किंमत (Complete Costs- C2) आणि त्यावर 50 टक्के नफा. वरुण गांधी यांनी पीएम मोदींना पत्र लिहून या फॉर्म्युला अंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने एमएसपी देण्याची विनंती केली आहे.

वरुण गांधी हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी ट्विट करणे सुरूच ठेवले. जोपर्यंत एमएसपीची वैधानिक हमी मिळत नाही तोपर्यंत अशा मंडईंमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होतच राहील, असे त्यांचे म्हणणे आहे. यावर कठोर कारवाई व्हायला हवी. लखीमपूर खेरी घटनेतील पीडितांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यासोबतच आपल्या पक्षाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, कृषी धोरणाचा फेरविचार ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. इतकंच नाही तर त्यांनी योगी सरकारचाही खरपूस समाचार घेत अशा सरकारचा अर्थ काय असं म्हटलं आहे. पिलीभीतमध्ये अतिवृष्टीदरम्यान आलेल्या पुराच्या संदर्भात त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर हल्लाबोल केला होता की, सामान्य माणसाला आहे त्या हलाखीच्या परिस्थितीत सोडले तर
तर अशा सरकारचा काय उपयोग आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here