Jaysiddheshwar Swami: खासदार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भाजपाचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी दिली प्रतिक्रिया

0

सोलापूर,दि.४: Jaysiddheshwar Swami: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर सोलापूरचे भाजपा खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज (Jaysiddheshwar Swami) यांना ओळखत नसल्याची प्रतिक्रिया दिली. यानंतर आता खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. “सुप्रिया सुळे मला ओळखत नसतील, पण मी त्यांना ओळखतो,” असं मत जय सिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी व्यक्त केलं. यावेळी पत्रकार परिषदेत भाजपा नेते सुभाष देशमुख देखील होते.

भाजपा खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज म्हणाले, “खासदार सुप्रिया सुळे मला ओळखत नसतील, पण मी त्यांना ओळखतो. आता जर मी त्यांच्यासमोर उभा राहिलो तरीही त्या मला ओळखत नसतील तर मी काही बोलू शकत नाही. आमची दोन-तीन वेळा भेट झाली आहे. मात्र, सोलापूरमधील विकास कामांबाबत त्यांच्याशी कोणताही विचारविनिमय झालेला नाही. कारण आम्ही ज्यांच्याशी चर्चा करायची होती त्यांच्याशी संवाद साधत राहिलो.”

“आम्ही मंत्रिमंडळातील जोशी आणि इतर व्यक्तींशी संवाद साधत आलो. यासाठी सुप्रिया सुळे यांच्याशी माझं काहीही बोलणं झालेलं नाही,” असंही जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी नमूद केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here