भाजपा आमदाराचे मनोज जरांगे आणि शरद पवार यांचा उल्लेख करत खळबळजनक विधान

0

मुंबई,दि.३०: BJP MLA Sanjay Kenekar On Sharad Pawar: भाजपा आमदाराने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करत खळबळजनक विधान केले आहे. मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. 

BJP MLA Sanjay Kenekar On Sharad Pawar

भाजपा आमदार संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांनी खळबळजनक विधान केले आहे. मनोज जरांगे पाटील हे शरद पवार यांचा सुसाईड बॉम्ब आहे असे विधान आमदार केनेकर यांनी केले आहे. केनेकर म्हणाले की, शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने हे नुकसान बूमरँग होणार आहे. हा सुसाईड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषापायी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे.

निश्चित हे बुमरँग होणार असून त्यातून समाजाचे नुकसान शरद पवार करत आहेत. हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहचवणारा आहे. त्यामुळे निश्चित याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगेंसारखे सुसाईड बॉम्ब या महाराष्ट्रात वापरतात. हे दुर्दैव आहे असं त्यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here