मुंबई,दि .27: भाजपा आमदार नितेश राणेंनी (Mla Nitesh Rane) शिवसेनेचे नेते मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केला आहे. राज्यात सध्या हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) वाद सुरु आहे. मंत्री सत्तार या व्हिडीओमध्ये हनुमानाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ 2017 मधील असल्याचा सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांना नितेश राणे यांचे आवाहन
सध्या राज्यात हनुमान चालिसा, मस्जिदवरील भोंगे यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वातावरण तापले आहे. यानंतर आमदार नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आवाहन दिले आहे. नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे की, “शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रभु हनुमानाबद्दल अर्वाच्च शिवीगाळ केली आहे. उद्धव ठाकरे स्वतला मर्द म्हणता ना, त्यांनी अब्दुल सत्तार यांना तुरुंगात टाकून दाखवा असे ट्वीट त्यांनी केले आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Chief Minister Uddhav Thackeray) निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली. हे दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.