Jaykumar Gore: भाजपा आमदार जयकुमार गोरे यांची गाडी नदीच्या पुलावरुन 50 फूट खोल दरीत कोसळली

0

सातारा,दि.24: Jaykumar Gore Accident: भाजपा आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची गाडी नदीच्या पुलावरुन 50 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore Car Accident) गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. 

गाडी 50 फूट खोल दरीत कोसळली | Jaykumar Gore Accident

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे भाजप आमदार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे रवाना होत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident News) झाला. साताऱ्यातील फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात होऊन गाडी तब्बल 50 फूट दरीत कोसळली. नदीच्या पुलाचा कठडा तोडून गाडी 50 फूट खाली कोसळली. साताऱ्यातील फलटणजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना गाडीला अपघात झाला आणि गाडी 50 फूटांवरुन खाली कोसळली. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यासोबत इतरही तिघं होते त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले | Jaykumar Gore

गोरे यांच्यासोबत गाडीत तिघंजण होते. त्यांचे कॉन्सटेबल, पीए आणि काही कार्यकर्ते जयकुमार गोरे यांच्यासोबत गाडीत होते. या तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. जयकुमार गोरे यांच्यासह गाडीत असलेल्या सर्वांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जाहिरात

गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयकुमार गोरेंसह इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. पण गंभीर दुखापत झाली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील फलटणजवळ आमदार गोरे यांचा भीषण अपघात झाला. अपघात अंदाजे पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य सुरू केलं. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here