sambit patra vs asaduddin owaisi : धमकीवजा इशारा देणारा एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसींचा (Asaduddin Owaisi) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा (Sambit Patra) यांनीही औवेसींनी प्रत्युत्तर दिलंय.
असुदुद्दीन औवेसींचा (Asaduddin Owaisi) यांचा व्हिडिओला शेअर करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनीही औवेसींनी प्रत्युत्तर दिलंय. किसे धमका रहे हो मियाँ? असा सवाल संबित पात्रा यांनी विचारला आहे.
सुनों हम ना डरे थे मुगलों से ना जिन्नावादियों से तो तुमसे क्या खाक डरेंगे!. जेव्हा जेव्हा या वीर भूमीवर औरंगजेब आणि बाबर चालून येईल, तेव्हा मातृभूमीतून वीर शिवाजी आणि महाराणा प्रताप जन्म घेईन, असे प्रत्युत्तर संबित पात्रा यांनी दिले आहे.
काय म्हणाले होते असुदुद्दीन औवेसी
मी तर त्या पोलीसवाल्यांना सांगू इच्छितो की, कायम योगीच मुख्यमंत्री राहणार नाहीत, किंवा मोदीच पंतप्रधान बनणार नाहीत. आम्ही मुसलमान वेळ पाहून शांत आहोत, पण आम्ही तुमच्या अत्याचाराला विसणार नाही. अल्लाह.. आपल्या ताकदीने तुम्हाला नेस्तनाबूद करेल आणि आम्ही हेच लक्षात ठेवू. जेव्हा वेळ बदलेल तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येईल? जेव्हा योगी आपल्या मठात जातील अन् मोदी डोंगरात निघून जातील, तेव्हा कोण येईल? आम्ही तेव्हा विसरणार नाही, असा धमकीवजा इशाराच औवेसींनी दिला आहे.