भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी लावली पैज, प्रसाद लाड यांना मिळतील 32 मतं

0

मुंबई,दि.20: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांच्यामध्ये भाजपाचे प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या विजयाबद्दल लेखी पैज लावल्याचे माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 10 जागांसाठी मतदान झाले. शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपलं नशिब आजमावत आहेत.

285 आमदारांचं विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झालं आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली म्हणून काँग्रेसने भाजपाच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला. पण आता काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला असून काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याच दरम्यान प्रसाद लाड यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे. 

प्रवीण दरेकर आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यामध्ये प्रसाद लाड यांच्या विजयाबद्दल पैज लागली आहे. प्रसाद लाड यांना 32 मतं मिळतील असं म्हटलं आहे. दरेकरांनी स्वाक्षरी करून बनसोडे यांना एक कागद दिल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसनं असंवेदनशीलतेचा कळस गाठला अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेसचे आरोप बेकायदेशीर असून परवानगी घेऊनच मतदान केल्याचं संजय कुंटे यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here