भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

0

मुंबई,दि.3: भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारासाठी शिवसेना (ठाकरे गट) महिला अत्याचाराच्या प्रश्नावर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमधून एका पॉर्न स्टारनं काम केलंय, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. शिवाय त्याचा फोटोही भर पत्रकार परिषदेत दाखवला होता.

वाघ यांच्या आरोपानंतर तो कलाकारच समोर आला आहे. त्यांने आपण नक्की कोण आहोत हे सांगताना वाघ यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चित्र वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय वाघ यांनी कोणतीही शहानिशा न करता येवढे मोठे विधान कसे केले याबाबतही जोरदार चर्चा रंगली आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “वॉर रुकवादी पापा” जाहिराती वरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठा आरोप केला होता. त्यातील कलाकार हा पॉर्नस्टार आहे असा दावा त्यांनी केला. या जाहीरातत बापच पॉर्नस्टार असेल तर काय करणार असा सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर तो कलाकारच समोर आला आहे. प्याराली उर्फ राज नयानी असे त्यांचे नाव आहे. ते कोणतेही पॉर्नस्टार नाहीत तर ते एक चरीत्र अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मालिका, जाहीराती आणि वेब सिरीजमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम केले आहे. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेला फोटो हा आपल्या वेब सिरीज मधला आहे असेही त्यांनी सांगितले.

माफी मागा नाही तर…

चित्रा वाघ यांनी केलेले आरोप हे चुकीचे आणि दुख: देणारे आहेत असे राज नयानी यांनी सांगितले. “मी एक चारित्र कलाकार आहे. एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन ” अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपली भूमिका एका व्हिडीओच्या माध्यमातून मांडली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here