BJP: दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भविष्यवाणी तंतोतंत ठरली खरी

0

दि.११: BJP: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. पाचपैकी चार राज्यात भाजपा (BJP) पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवला आहे. या निकालानंतर अनेकांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे (Atal Bihari Vajpayee) दोन दशकांपूर्वीच शब्द आठवले.

१९९७ मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाही. भाजपाचे सरकार केवळ एक मतामुळे कोसळले. त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी म्हटले की, “आज आमचे सरकार एक मतामुळे पडले आहे. आमचे कमी सदस्य असल्यामुळे काँग्रेस हसत आहे परंतु काँग्रेसने माझे शब्द लक्षात ठेवावे, एक दिवस असा येईल की पूर्ण भारतात आमचे सरकार असेल आणि देश काँग्रेसवर हसत असेल.”

१९९७ साली काँग्रेसचे खासदार गिरधर गोमांन यांनी लोकसभेत केलेल्या मतदानानं वाजपेयी यांचं सरकार कोसळलं होतं. मात्र दोन दशकांमध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या झाडूनं काँग्रेसचा झाडूनं पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर #atalbiharivajpayee ट्रेंड होऊ लागला.

२०१४ मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून देशभरात काँग्रेसच्या पतनाची सुरुवात झाली. उत्तर प्रदेशनं काँग्रेसला अनेक दिग्गज नेते दिले. त्याच उत्तर प्रदेशात आता काँग्रेसला केवळ २.३३ टक्के मतं मिळाली. तर भाजपला ४१.२९ टक्के मतदान झालं. सत्ता असलेल्या पंजाबमध्येही काँग्रेसची धूळधाण उडाली. पंजाबमध्ये काँग्रेसला २२.९८ टक्के मतं मिळाली. तर आपनं ४२.०१ टक्के मतं मिळवत सत्ता मिळवली.

अंधेरा छटेगा, कमल खिलेगा, हे अटलबिहारी वाजपेयींचे शब्द आज खरे ठरताना दिसत आहेत. आम्ही मेहनत केली आहे. आम्ही संघर्ष केला आहे. हा ३६५ दिवस चालणारा पक्ष आहे. आम्ही केवळ निवडणुकीत दिसत नाही. आम्ही बहुमताची वाट पाहू, अशा शब्दांत वाजपेयींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. गेल्या ८ वर्षांत भाजपनं देशभरात जोरदार कामगिरी केली आहे. लोकसभा असो वा विधानभा निवडणुका, भाजपनं नेत्रदीपक कामगिरी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here