नवी मुंबई,दि.7: भाजपाच्या (BJP) माजी नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने अटक करण्यात आली आहे. कोपर खैरणे येथील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना कोपर खैरणे पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुकवर संदीप म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.
फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर शिवसैनिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याआधारे गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रात्री उशिरा संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. संदीप म्हात्रे हे यापूर्वी देखील मारहाण प्रकरणात कायद्यात अडकले होते.