नागपूर,दि.10: BJP: भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील आमदार भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसा दावाही नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा असाच दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 14 तारखेला मोठा पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशाचा मोठा भूकंप राज्याला बसणार आहे. आम्ही बोलाची कढी करत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? | Chandrashekhar Bawankule
14 तारखेला राज्यात मोठा भूकंप होणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र त्यांनी हा दावा करताना कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही. त्यामुळे बावनकुळे यांचा रोख नेमका कोणत्या पक्षाकडे आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील भाजप नेत्यांकडून अशाप्रकारचे दावे करण्यात आले आहेत.
राज्यात पुढील काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लागू शकतो. या निवडणुकांमध्ये मनसे भाजप आणि शिंदे गटासोबत युती करणार असल्याची चर्चा आहे. यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्यासोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.