BJP: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतला मोठा निर्णय

0

मुंबई,दि.१७: BJP: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येथे चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. अखेर निवडणुकीतू अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलेली विनंती, शरद पवारांचे आवाहन आणि प्रताप सरनाईक यांचे पत्र, यानंतर भाजप नेत्यांमध्ये तातडीच्या बैठका झाल्या आणि अखेर शिवसेना उमेदवार ऋुतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे, आता अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार नसणार आहे. 

आधी राज ठाकरेंचं पत्र, त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी, अशी केलेली विनंती. तर, गोपीनाथ मुंडेंच्या मतदारसंघाचा दाखला देत शरद पवार यांचेही भाजपला पोटनिवडणूक न लढविण्याबाबत आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. शरद पवारांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपला आहे, त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यासाठीच, देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री तातडीची बैठकही घेतली. 

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्यात बैठकझाली. या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेतल्याचा निर्मय जाहीर केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज परत घेत आहे. लटके या निवडून याव्या यासाठी अर्ज परत घेत आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मेघदूत’ बंगल्यावर रविवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकील मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) उपस्थित होते. मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम होते. आपली पूर्ण तयारी झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. तर आशिष शेलार यांचाही पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह होता. मात्र, अखेर सी. टी. राव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे, आता, ऋुतुजा लटके यांचा विजय सोपा झाला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here