Bitcoin Scam: भाजपाच्या माजी आमदारासह 14 जणांना जन्मठेप

0

सोलापूर,दि.30: Bitcoin Scam: भाजपचा माजी आमदार, आयपीएससह 14 जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गुजरातमधील प्रसिद्ध कोट्यवधी रुपयांच्या बिटकॉइन प्रकरणात न्यायालयाने 14 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी विशेष एबीसी न्यायालयाने भाजपा माजी आमदार नलिन कोटाडिया, अमरेलीचे माजी एसपी जगदीश पटेल आणि माजी पीआय अनंत पटेल यांच्यासह 14 आरोपींना दोषी ठरवले.

त्यानंतर न्यायालयाने सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने धारीचे माजी आमदार कोटाडिया, अमरेलीचे तत्कालीन एसपी जगदीश पटेल, माजी पोलिस अधिक्षक अनंत पटेल यांच्यासह १५ पैकी १४ आरोपींना दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

हा खटला 2018 मध्ये बिल्डर शैलेश भट्ट यांच्याकडून 176 बिटकॉइन आणि 32 लाख रुपयांच्या रोख रकमेच्या अपहरणाशी संबंधित आहे. 2018 मध्ये सुरतचे विकासक शैलेश भट्ट यांनी माजी आमदार आणि माजी पोलीस अधीक्षकांवर अनेक गंभीर आरोप केले. एका प्रकरणात चौकशीच्या बहाण्याने अमरेली जिह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना एका अज्ञात स्थळी नेऊन डांबून ठेवल्याचा आरोप भट्ट यांनी केला.

इतकेच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून 12 कोटी रुपयांच्या किमतीचे बिटकॉइन आपल्या खात्यात वळते करून घेतले. या कटात भाजपचे माजी आमदार नलिन कोटडिया यांचाही सहभाग होता. तसेच भट्ट यांनी आपला साथीदार किरीट पलाडिया याच्यावरही आरोप केले होते. सीआयडी तपासात भट्ट यांनी केलेले आरोप सिद्ध झाले. किरीट पलाडिया यानेच हा संपूर्ण कट रचल्याचे समोर आले.

सीआयडीने जगदीश पटेल यांनाही अटक केली आणि पुढील तपास सुरू ठेवला. कोटडियाची ‘फिक्सर’ म्हणून भूमिका समोर आली. हे प्रकरण गुजरातमधील सर्वात हाय-प्रोफाइल सायबर गुन्ह्यांशी संबंधित खंडणी प्रकरणांपैकी एक आहे , ज्यामध्ये पोलिस अधिकारी, राजकीय व्यक्ती आणि खाजगी व्यक्तींमधील खोल संबंध उघड झाले आहेत. अहमदाबादमधील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑगस्ट २०२४ मध्ये २,०९१ बिटकॉइन, ११,००० लाईटकॉइन आणि १४.५० कोटी रुपये रोख रकमेच्या खंडणीच्या चालू तपासाचा भाग म्हणून शैलेश भट्ट यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार अटक केली होती, एकूण १२३२.५० कोटी रुपये.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here