दि.2: Bird Snake Viral Video: सोशल मीडिया (Social Media) हे असे विश्व आहे, जिथे दररोज काहीना काही व्हायरल होत असते. इंटरनेट हे एक जग आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की जे आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात, काही व्हिडिओ असे असतात की ते पाहून आपले हसू आवरता येत नाही, तर काही व्हिडीओ असे असतात की ज्यांच्यामुळे घाबरून अंगावर काटे येतात.
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जगातील सर्वात धोकादायक साप किंग कोब्राचा (King Cobra) आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हे देखील समजेल की किंग कोब्रासोबत पंगा घेणे किती धोकादायक आहे. घरट्यात (Bird Nest) घातलेली अंडी वाचवण्यासाठी एक छोटा पक्षी जीवाची पर्वा न करता एका विषारी किंग कोब्राशी (Poisonous King Cobra) कसा लढतो हे व्हिडिओमध्ये दिसून येते.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महाकाय किंग कोब्रा झाडाला लटकलेल्या घरट्यात कसा गुंडाळलेला आहे. किंग कोब्राने घरटे पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. नीट बघा, नागाने आपली फणा घरट्यात टाकला आहे, तेव्हाच शेजारी घिरट्या घालणाऱ्या पक्ष्याला आपल्या अंड्याची काळजी वाटते आणि कोब्राला न घाबरता आणि जीवाची पर्वा न करता तो किंग कोब्राशी पंगा घेतो. पक्षी कोब्राभोवती जोरात घिरट्या घालू लागतो, नागावर चोचीने हल्ला करतो, त्यामुळे विषारी नाग तिथून पळून जातो.
त्यामुळे एका लहान पक्ष्यासमोर धोकादायक सापालाही कसे हार मानावी लागली हे तुम्ही पाहिले. पक्षी असो वा मानव, आई ही आई असते, ती आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी कोणाला घाबरत नाही आणि जीवाची पर्वा न करता कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार असते. लोक व्हिडिओवर कमेंट करत आहेत.