सोलापूर,दि.१७: Bijju Pradhane Joins BJP: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) सोलापूरचे नेते बिज्जू प्रधाने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते बिज्जू प्रधाने यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रधाने यांनी यांनी तत्कालीन भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रधाने यांना अजित पवार गटात प्रवेश केला. आता परत बिज्जू प्रधाने स्वगृही परत आले आहेत. बिज्जू प्रधाने यांचा सोलापूर शहरात चांगला संपर्क आहे. मदतीसाठी कधीही तयार असणारा नेता म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा संपर्क एका वार्डापूरता मर्यादित नसून शहर आणि ग्रामीण भागात आहे. प्रधाने हे आण्णा म्हणून परिचित आहेत. ते प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून येत असतात म्हणून कार्यकर्ते म्हणतात, “राजाचे राजपण कालपण आजपण उद्यापण, आण्णा तुमच्यासाठी कायपण!”

बिज्जू प्रधाने यांनी जात धर्म न पाहता अनेकांना मदत केल्याचे सांगितले जाते. भारतीय जनता पक्षाला प्रधाने यांच्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी (दि.१६), बिज्जू प्रधानेंसह माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, माजी सभागृहनेता सुरेश पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला अध्यक्षा रंजीता चाकोते यांच्या उपस्थितीत सर्वांनी भाजपात प्रवेश केला.








