धुळे,दि.1: एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे गटात अनेकजण प्रवेश करत आहेत. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेही अनेकजण प्रवेश करत आहेत. शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. नुकतंच बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ते धुळ्यातील सभेत बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले
बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंद गटात सहभागी होतील असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
“गुलाबराव पाटलांनr ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतरही मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मात्र त्यांचा संवाद कायम आहे. एकनाथ शिंदे गणेशोत्सवात मिलिंद नार्वेकर यांच्या घरी दर्शनासाठी पोहोचले होते. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी ज्यांना पाठवलं होतं, त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता.