छत्रपती संभाजीनगर,दि.23: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख केला आहे. मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे. हैदराबाद गॅझेट सांगतंय त्या सरकारी नोंदी आहेत. सरकारने सडेतोड भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय नाही. हैदराबाद गॅझेट सांगतंय त्या सरकारी नोंदी आहेत.त्याचा रेकॉर्ड तपासलं जात नाहीये, ते आधी तपासायला तातडीने सुरूवात करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मुस्लिम…
मुसलमानांच्या सुद्धा सरकारी नोंदी निघाल्यात. जर त्यांच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात. काही लिंगायत, ब्राह्मण, लोहार, मारवाडी समाजाच्याही कुणबी नोंदी निघाल्यात. मग मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये. जे कायद्याने बोलायचे ते कायद्याने बोला. पाशा पटेल यांची कुणबी म्हणून नोंद निघाली. जर मुस्लिमांच्या कुणबी म्हणून सरकारी नोंदी निघाल्या असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे. ते आरक्षण कसं देत नाही तेच मी बघतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेले आरक्षण सोडून…
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, १९६७ नंतर आरक्षणात समाविष्ट केलेल्या जातीच्या नोंदी नाहीत मग कशाच्या आधारे तुम्ही १६ टक्के आरक्षण दिले? आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही दिले कसे? इतके दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो. तुम्ही प्रत्येकवेळी आमच्या ताटात औषध कालवायचं काम केले. ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. कसल्याही नोंदी नसतानाही बेकायदेशीर आणि बोगस आरक्षण ज्यांना दिले ते तुम्ही कायदेशीर म्हणतायेत. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेले आरक्षण सोडून इतर आरक्षण रद्द करून टाका. विदर्भ आणि खान्देशातील कुणबी मराठा एकच आहेत विधानसभेला दाखवतो. या लोकांना दिलेले 16 टक्के आरक्षण रद्द करा, नाहीतर या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार असंही त्यांनी सांगितले.
ओबीसी असो अथवा मराठा प्रत्येकाला
मी कसा बदनाम होईल यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत.विरोधकांशी लढायला मी समर्थ आहे, मात्र आपलेच लोक विरोध करत आहे. तुम्ही नाही दिलं तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल.आचारसंहिता नंतर देऊ म्हणाल तर आम्ही ऐकणार नाही. ओबीसी असो अथवा मराठा प्रत्येकाला ठासून सांगायचं सरकारने शिकलं पाहिजे.