मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

0

मुंबई,दि.१३ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भुमिका घेतली आहे. राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीची पत्रं आली होती. यासंबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. कालच राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. आज अखेर राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी असणार सुरक्षा व्यवस्था

राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा पूर्वीचाच Y+ असणार आहे.
मात्र त्यांच्या सुरक्षेतील ताफ्यात पोलिसांची वाढ करण्यात आली आहे. सुरक्षा ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये चर्चा

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल (गुरूवारी) संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने राज ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत चर्चा झाली. याअगोदर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत नांदगावकर आणि गृहमंत्री वळसे पाटलांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यानंतर काल वळसे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयीची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here