लाऊड स्पीकर वादानंतर राज्यातील या शहरातील पोलिसांचा मोठा निर्णय

0

मुंबई,दि.२०: महाराष्ट्रात भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. भोंग्याच्या वादानंतर परवानगी घेऊन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भोंगे लावावे लागतील असे आदेश काढण्यात आले आहेत. लाऊड स्पीकर बंदीच्या वादानंतर मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वाजवू नये, अर्थात वाजवलं तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेश मुंबई पोलिसांनी काढले आहेत. सायलेंट झोनमधल्या धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरची परवानगी नाही तसेच अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरची परवानगी मिळणार नाही, असे आदेशही पोलिसांनी निर्गमित केले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सची मुंबई पोलिसांनी सक्त अंमलबजावणी करणं सुरु केली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांची स्वतंत्र टीम तयार केली गेली आहे. एखाद्या भागात रात्री १० ते सकाळी ६ वाजताच्या दरम्यान जर भोंगा वाजला तर आणि संबंधित तक्रार जर कंट्रोल रुमला आली तर पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहेत.

तसेच मुंबई पोलिसांनी समाजविघातक कृत्ये, जातीय चिथावणी अशा कामात गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय दंड विधान संहिता कलम १४४, १४९ आणि १५१ अंतर्गत समाजविघातक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासंबंधीची तयारी मुंबई पोलिस करत आहे. काही लोकांना आधीच यासंबंधित याआधीच नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांचे नेमके निर्देश काय?

रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण मुंबई शहरात लाऊड स्पीकरवर बंदी असेल

सायलेंट झोनमध्ये कुणालाही लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी नसणार आहे.

अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरची परवानगी मिळणार नाही

कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, तेढ, तणाव निर्माण करणारी लोकांवर कारवाई होणार


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here