लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय

0

जालना,दि.30: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाचे प्रत्येक मतदारसंघात शेकडो अर्ज दाखल करण्याचे ठरले होते. मात्र यात बदल करत एकच उमेदवार उभा करण्यासंदर्भात अनेकांची मते जाणून घेण्यात आली. प्रत्येक गावामधून मराठा समाजाचा उमेदवार देणार असल्याची चर्चा होती. मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून कोणाला मतदान करायचं हे सांगत कोणत्या उमेदवाराला पाडायचं हे सांगितलं आहे.

मनोज जरांगे यांनी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही, अशी घोषणा केली. ज्याला पाडायचंय त्याला पाडा. जो सगेसोयरे कायद्याला विरोध करेल त्याला पाडा, असे ते यावेळी म्हणाले. निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते पण त्यांच्यात ताकद असते ते पाडू शकतात.लोकसभा ही अंतिम लढाई नाही पुढे विधानसभेलाही आपल्याकडे वेळ आहे. आता कमी वेळ आहे. गावागावात समाज पोहोचला नाहीय. इतक्या कमी डेटावर मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेता येणार नाही, असे ते म्हणाले. 

कोणालाही मतदान करा पण…

तुमच्या आमच्या हट्टापायी जात संपवायची नाही. जो आपल्या बाजूने उभा राहील त्याला मतदान करा, बाकीचे पाडून टाका. भावनेचा आहारी जाऊन निवडणुका होत नाहीत. यांना धसकी होती म्हणून यांनी उमेदवार दिला नाही. उद्यापासून बघा कशा उमेदवारी देतात, आपल्या जातीमुळे हे फुल गॅसवर होते. शिक्का असा हनायचा, ते म्हणाले पाहिजे मराठ्यांच्या नादी लागायचे नाही. कोणालाही मतदान करा, पण तो सग्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे. मी कोणालाही मतदान करणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here