शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

0

मुंबई,दि.16: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरुन 34 टक्के होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. 

शिंदे फडणवीस सरकारच्या खातेवाटपानंतरची मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. परिवहन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागसाठी निर्णय घेण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरणेत येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here