BHU विद्यार्थ्यांची कुलगुरूंनी माफी मागण्याची मागणी, विद्यार्थी गंगाजल घेऊन निवासस्थानी पोहोचले

0

वाराणसी,दि.30: बनारस हिंदू विद्यापीठ अर्थात बीएचयूमध्ये (BHU) इफ्तार पार्टीमुळे विद्यार्थी भडकले आहेत. इफ्तार पार्टी आणि भिंतींवर लिहिलेल्या ब्राह्मणविरोधी घोषणांमुळे संतप्त झालेल्या बीएचयूच्या (banaras hindu university) विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी कुलगुरूंच्या निवासस्थानाच्या गेटवर जाऊन गंगाजलाने शुद्धीकरणासह मुंडण करून आपला निषेध व्यक्त केला.

वाराणसीच्या बीएचयू कॅम्पसमध्ये असलेल्या महिला महाविद्यालयात दोन दिवसांपूर्वी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी बीएचयूच्या भिंतींवर ब्राह्मणविरोधी आणि आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. एक दिवस आधी म्हणजेच 28 एप्रिलच्या संध्याकाळी आंदोलनाचा सूर थंडावला होता.

गेल्या 24 तासांपासून शांत राहिल्यानंतर पुन्हा एकदा बीएचयूमध्ये निषेधाचे आवाज ऐकू आले. डझनभर संतप्त विद्यार्थी बॅनर-पोस्टर आणि गंगाजल घेऊन कुलगुरूंच्या निवासस्थानावर पोहोचले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गेटवर थांबवले असता विद्यार्थ्यांनी तेथे बसून गंगाजल शिंपडून कुलगुरूंच्या सदबुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली.

एका विद्यार्थ्याने कुलगुरूंच्या निवासस्थानाबाहेर मुंडण करून इफ्तार आणि काश्मीर, ब्राह्मणांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी विद्यार्थ्यांनी बीएचयूच्या इस्लामीकरणाचा आरोप करत घोषणाबाजी केली आणि आक्षेपार्ह घोषणा लिहिणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची मागणी केली. या आंदोलनात सहभागी असलेल्या शुभम, आशीर्वाद यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी कुलगुरूंनी इफ्तारला उपस्थित राहल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here