Bhim Army: चित्रा वाघ यांनी केली चंदकांत पाटील यांची महात्मा ज्योतिबा फुलेंशी तुलना, भीम आर्मीचा इशारा

Bhim Army: चंद्रकांत पाटील यांची महात्मा ज्योतिबा फुलेंशी तुलना

0

मुंबई,दि.३०: Bhim Army On Chitra Wagh: भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दलच्या वक्तव्यानंतर भीम आर्मी (Bhim Army) आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. आता भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांना सुद्धा तोंडावर शाई फेकणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.

आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या…. | Chitra Wagh

पुण्यातील हळदी-कुंकाच्या कार्यक्रमामध्ये ‘घराघरात सावित्री झाल्या आहेत. आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध आहे,’ असे विधान चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यांच्या विधानावर भीम आर्मीने आक्षेप घेतला आहे. आमच्या महिला ब्रिगेड चित्रा वाघ यांचे शाईने तोंड काळ केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराचा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.

तुम्ही महात्मा फुलेंचा अवमान केला आहे | Bhim Army On Chitra Wagh

चित्रा वाघ तूमचं डोकं फिरलंय का? चंद्रकांत पाटलांना महात्मा ज्योतिबा फुलेंची उपमा देवून तुम्ही महात्मा फुलेंचा अवमान केला आहे . महाराष्ट्राचा,देशाचा अवमान केला आहे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुमच्या वक्तव्याचा जाहीर तीव्र निषेध आहे. भीम आर्मी च्या महिला ब्रिगेड तुमचा शाईने सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये लवकरच करतील, असा इशाराच भीमा आर्मीचे अशोक कांबळे यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

“काही मिनिटांपूर्वी दादा खूप छान बोलले. आज पहिल्यांदा एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात. मी नेहमी म्हणते की पुणे हे स्त्री शक्तीचे केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्री शक्तीच्या चळवळींची सुरुवात झालेली आहे. मी नेहमीच म्हणते की आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत. मात्र, चंद्रकांत दादा आणि हेमंत रासने यांच्यासारख्या जोतिबांचा शोध मात्र जारी आहे. असेच जोतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण होवोत, अशा सुभेच्छा देते,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here