दि.12: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये (AUS vs PAK) झालेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर ‘भारत माता की जय’ ची घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (दि.11) झालेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. क्रिकेट जगतातून ऑस्ट्रेलिया संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा मॅथ्यू वेडने (Mathew Wade) शाहिन आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत एक ओव्हर शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅथ्यू वेडने 17 बॉलमध्ये 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने 30 बॉलमध्ये 49 रन केले. पाकिस्तानकडून शादाब खानला 4 आणि शाहिन आफ्रिदीला 1 विकेट मिळाली. पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे.
हा व्हिडिओ पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलचा असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात तसे असेल, तर भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही स्टेडियममध्ये त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होत आहे, ही मोठी गोष्ट आहे. भारतीय चाहत्यांनी हा व्हिडिओ खूप लाइक आणि शेअर केला आहे.
या विजयानंतर प्रेक्षकांमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ‘भारत माता की जय’ आणि वंदे मातरम अशा घोषणा देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.