benefits of eating watermelon peel: कलिंगडाच्या साली खाण्याचे इतके आहेत फायदे

0

दि.18: benefits of eating watermelon peel: कलिंगड, खरबूज हे उन्हाळ्यात अनेकजण खातात. बऱ्याच जणांना कलिंगड (watermelon) खाण्याचे फायदे माहीत असतील. मात्र कलिंगडाच्या साली खाण्याचे फायदे अनेकांना माहीत नसतील. साली खाण्याचे अनेक फायदे आहेत. सालींमध्ये खूप पोषकतत्व असतात. (benefits of eating watermelon peel)

यात अँटिऑक्सिडंट्स, क आणि ब 6 जीवनसत्व, झिंक, पोटॅशियम आणि खनिजांसह लायकोपिन, सिटूललाईन क्लोरोफिल आणि फेनॉलिकसारखी पोषकतत्व असतात. त्यामुळं टरबूज खाल्ल्यानंतर त्याची सालं फेकून देत असाल तर आधी हे वाचा. या सालींचं तुम्ही लोणचं किंवा टुटी-फ्रुटी बनवू शकता. (benefits of eating watermelon peel)

रोगप्रतिकारशक्ती वाढते

कलिंगडाच्या साली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदतीच्या ठरतात. यात खूप प्रमाणात की जीवनसत्व असतं. हे रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत ठेवतं. सोबतच हे पांढऱ्या पेशींच्या निर्मितीलाही प्रोत्साहन देतं. यातून शरीरात संसर्ग होत नाही आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

रक्तदाबावर नियंत्रण राहतं

कलिंगडाच्या साली खाल्ल्यानं रक्तदाब नियंत्रित करण्यातही मदत मिळते. तुम्हालाही रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर या मोसमात टरबुजाच्या साली नक्की खा.

बद्धकोष्ठता दूर होतेबद्धकोष्ठता दार करण्यासही टरबुजाच्या साली खाल्ल्या पाहिजेत. यात खूप फायबर असतं. (eating watermelon peel uses)

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतंटरबुजाच्या साली खाल्ल्यानं रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. तुम्हाला असं वाटत असेल, की तुमच्या रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल योग्य रहावं, तर या उन्हाळ्यात तुम्हीही टरबुजाची सालं नक्की खा.

ऊर्जा वाढतेटरबुजाची सालं खाल्ल्यानं ऊर्जा वाढते. या सालींमध्ये सिटूललाईन अमिनो ऍसिड असतं. हे मांसपेशींना ऑक्सिजन पुरवतं. यातून शरीराला ऊर्जा मिळते. वर्कआउट करण्यातही मदत मिळते.

वजन कमी होतंवजन कमी करण्यासही टरबुजाच्या साली खाल्ल्या पाहिजेत. साली खाल्ल्यानं फॅट बर्न होतं. सालींमधील सिटूललाईन अमिनो ऍसिड यासाठी मदत करतं


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here