Medical Gadgets: देशासह महाराष्ट्र ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याकरिता सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लसीकरण हे महत्वाचे हत्त्यार आहे. या बरोबरच सुरक्षित अंतर राखणे, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या काळात आपल्या घरात काही मेडिकल गॅझेट्स (Medical Gadgets) असणे गरजेचे आहे. तुम्ही या डिव्हाइसला खरेदी करू शकता. तसेच आपल्या घरात ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही गॅझेट्स संबंधी माहिती देत आहोत. जे करोना काळात तुमच्या मदतीसाठी उपयोगी पडतील. जाणून घ्या डिटेल्स.
Pulse Oximeter
कोरोना काळात Pulse Oximeter खूपच आवश्यक आहे. यावरून तुम्ही ब्लड ऑक्सिजन लेवल चेक करू शकता. ब्लड ऑक्सिजन कमी असल्यास तत्काळ डॉक्टरशी संपर्क करू शकता. या डिव्हाइसची किंमत फक्त ५०० रुपयांपासून सुरू होते.
Contactless thermometer
Contactless किंवा आयआर थर्मामीटर विना बॉडीचे फिजिकल टच सुद्धा टेंपरेचर मोजता येते. याला तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. याची किंमत १ हजार रुपये पर्यंत आहे.
Covid-19 Rapid Antigen सेल्फ टेस्ट किट
Covid-19 Rapid Antigen सेल्फ टेस्ट किट गॅझेट नाही. परंतु, याला घरात ठेवणे खूपच गरजेचे आहे. याने यूजर स्वतः रॅपिड एंटिजेन करू शकतात. याला तुम्ही २५० रुपये ते ३०० रुपयादरम्यान खरेदी करू शकतात.
Nebulizer मशीन
या मशीनने लंग्समध्ये थेट ऑक्सिजन पोहोचवले जाऊ शकते. या डिव्हाइसला ऑनलाइनवरून १ हजार ते १५०० रुपयात खरेदी करता येते.
UV Sterilizer
याला तुम्ही गॅझेट्स आणि दुसऱ्या डिव्हाइसला इंफेक्शन आणि किटाणू पासून फ्री ठेऊ शकता. हे वेगवेगळ्या साईट आणि स्टोर्सवर उपलब्ध आहे. तुम्ही स्टीक, बॉक्स किंवा ओटीजी सारख्या डिझाइनचे UV Sterilizer खरेदी करू शकता. याची किंमत १ हजार रुपयांपासून सुरू होते.