दि.27: WhatsApp चा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सोशल मीडियावर (Social Media) सर्वाधिक पसंती असलेले WhatsApp मेसेजिंग ॲप आहे. अनेकजण व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये (WhatsApp Group) असतात. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अनेकजण मेसेज पाठवतात व त्या ग्रुपमधील सदस्य तो मेसेज पुढच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करतात. मात्र त्या मेसेजची खातरजमा न करता पुढे फॉरवर्ड करणे महागात पडू शकते.
कोणताही मेसेज फॉरवर्ड करीत असाल तर आताच अलर्ट राहण्याची गरज आहे. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक असून यामुळे तुमची थेट जेलमध्ये रवानगी केली जाऊ शकते. देशात असे अनेक प्रकरणे समोर आले आहेत की, ज्यामुळे अनेकांना जेलची हवा खावी लागली आहे. त्यामुळे कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना त्याची खातरजमा करूनच तो पुढे फॉरवर्ड करणे सोईस्कर आहे.
WhatsApp ग्रुप
जर तुम्ही एखाद्या ग्रुपचे ॲडमिन असाल किंवा ग्रुपमधील मेंबरने ग्रुपवर शेअर केलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही फॉरवर्ड करीत असाल तर एकदा ही माहिती वाचून घ्या. ही माहिती खरी आहे की खोटी आहे. याची एकदा पडताळणी करून घ्या. जर ती माहिती लोकांच्या हिताची वाटत असेल तरच ती अन्य सदस्याला फॉरवर्ड करा. अन्यथा असे करू नका. चुकीची माहिती, समाजात द्वेष पसरवणारी माहिती, अश्लिल माहिती शेअर करणाऱ्यांवर आयटी सेलचे बारीक लक्ष आहे. या संबंधी कुणी जर तक्रार केली तर तुम्ही चांगलेच अडचणीत येऊ शकतात. तुम्हाला गुन्ह्याखाली अटक होऊ शकते. तसेच जेल मध्येही जावे लागू शकते.
आपत्तीजनक मेसेजला फॉरवर्ड करू नका | Do not forward offensive messages
जर तुम्ही आपत्तीजनक मेसेजला फॉरवर्ड करीत असाल तर तुमची जेलमध्ये रवानगी होऊ शकते. जे मेसेज चुकीचे आहेत, पूर्णपणे आधारहीन आहेत. जनतेत संभ्रम पसरवणारे आहेत, असे मेसेज चुकूनही फॉरवर्ड करू नका. असे मेसेज तुम्हाला अडचणीत आणू शकतात. त्यामुळे वेळीच अलर्ट राहा. चांगल्या बातम्या वाचा व शेअर करा. कुणाच्याही अर्थवट माहिती असणाऱ्या, अश्लिलतेला प्रोत्साहन देणाऱ्या, कुणाचेही हनन करणाऱ्या किंवा द्वेष पसरवणाऱ्या बातम्या किंवा मजकूर फॉरवर्ड करू नका. असे कुणी करीत असेल तर त्याला वेळीच रोखा, ग्रुपमधून काढून टाका.