YONO खाते बंद करण्याचा SBI च्या नावाने मेसेज आला तर व्हा सावध

0

दि.12:ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. देशात डिजिटल व्यवहारात वाढ झाल्यापासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. तुमचे YONO खाते बंद केले, असे सांगून तुम्हाला तुमच्या फोनवर SBI कडून मेसेज आला आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगतोय की, हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना असा कोणताही मेसेज पाठवलेला नाही. म्हणून जर तुम्हाला देखील हा मेसेज प्राप्त झाला असेल तर सावध व्हा. पीआयबी फॅक्ट चेकने ही माहिती दिलीय.

पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करत म्हटले आहे की, एक बनावट मेसेज बाहेर येत आहे, जो एसबीआयचा असल्याचा दावा केला जात आहे. आपले योनो खाते बंद केले गेलेय, असा दावा करते. त्याने त्याच्या ट्विटर हँडलवर मेसेजचा स्क्रीनशॉट देखील शेअर केलाय. योनो खाते बंद केले गेलेय. मेसेजमध्ये तुम्हाला तुमचे पॅन कार्ड अपडेट करून नेट बँकिंगमध्ये लॉगिन करण्यास सांगितले जाते. त्यात एक लिंकही शेअर करण्यात आलीय, ज्यावर युजरला क्लिक करावे लागेल. ही लिंक पूर्णपणे बनावट आहे. त्यामुळे त्यावर अजिबात क्लिक करू नका आणि तुमची कोणतीही बँकिंग किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

सायबर गुन्हेगारांसाठी तुम्हाला फसवणुकीचा बळी बनवण्याचा हा एक मार्ग असू शकतो. त्यामुळे त्यात तुम्ही अजिबात पडू नका. तसेच तुमचे YONO खाते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क विचारल्यास असे कोणतेही शुल्क भरू नका.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here