दि.25: IPL बाबत BCCI आज महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन नव्या टीम असतील याची घोषणा बीसीसीआयनं (BCCI) यापूर्वीच केली आहे. या दोन नव्या टीम कोणत्या असतील याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या दोन नव्या टीमचा निर्णय सोमवारी होणार आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी दुबईमध्ये उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर या दोन फ्रँचायझींसाठी लावण्यात आलेल्या सर्व बोली सादर करण्यात येतील. त्यानंतर या बाबतचे नेमण्यात आलेले बीसीसीआयचे अधिकारी नव्या दोन फ्रँचाझींची घोषणा करतील.
आयपीएल लिलावासाठी नव्या टीमचे बेस प्राईस 2 हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. या टीमच्या खरेदी साठी अनेक मोठ्या बिझनेस ग्रुपनं रस दाखवला आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड देखील (Manchester United) आयपीएलमध्ये एन्ट्री करण्यासाठी उत्सुक आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असलेलं दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह (Deepika Padukone-Ranveer Singh) ही जोडी देखील नवी टीम खरेदी करण्यासाठी इच्छूक असल्याचं वृत्त आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे दोघंही त्यांच्या चित्रपटाबरोबरच स्पोर्ट्स फॅन म्हणून प्रसिद्ध आहेत दीपिकी भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी असून ती देखील नॅशनल बॅडमिंटनपटू आहे. तर रणवीर प्रीमियर लीग पासून NBA पर्यंतच्या ग्लोबल लीगचा भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
दीपिका-रणवीर हे दोघंच नव्या टीमसाठी बोली लावणार की त्यांच्यासोबत अन्य भागीदार आहेत. तसंच ते कोणत्या शहराच्या टीमसाठी बोली लावणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरपीएसजी ग्रुपचे संजीव गोयंका, ऑरोबिंदो फार्मा, टोरेंट फार्मास्युटिकल्स, ब्रॉडकास्ट ऍण्ड स्पोर्ट्स कन्सलटिंग एजन्सीज आयटीडब्ल्यू, ग्रुप एम, सिंगापूरची प्रायव्हेट इक्विटी फर्म आणि इतर काही कंपन्यांनी टेंडर विकत घेतली आहेत.