काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जीभ घसरली

0

चंद्रपूर,दि.14: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी ब्राह्मण समाजावर शिवराळ भाषेत टीका केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना बाळू धानोरकर यांची जीभ घसरली आहे.

काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेनिमित भद्रावती येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर बोलत होते. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका करतांना धानोरकर यांनी त्यांचा मोर्चा राज्यातील सत्ताधाऱ्यांकडे वळवला. ते म्हणाले, राज्याच्या मंत्री मंडळात भ्ष्टाचारी, नालायक लोकांचा समावेश आहे.

2022 पासून संपूर्ण देशामध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने काँग्रेसच्या (Congress) माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) हे लुटारू सरकार असून, 2024 च्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

मंत्री भ्रष्टचारी असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना क्लीन चीट दिली आहे. त्यांना मानावे लागले. जन्माला यायचं असेल तर ब्राह्मणांच्याच पोटी याव. आज ब्राम्हणांची पोर खारिक बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुलं जांभया देत आहेत, असे ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here