Home राजकारण बाळे येथेच ‘अप्पर तहसील कार्यालय’ मंजूर करा किंवा सध्याच्या ठिकाणी कायम ठेवा;...

बाळे येथेच ‘अप्पर तहसील कार्यालय’ मंजूर करा किंवा सध्याच्या ठिकाणी कायम ठेवा; पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

0

सोलापूर,दि.१२: उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रस्तावित ‘अप्पर तहसील कार्यालय’ मौजे बाळे येथे मंजूर करावे, अथवा सध्या ज्या ठिकाणी हे कार्यालय कार्यरत आहे, तेथेच ते कायम ठेवावे, अशी मागणी प्रभाग ५ च्या लोकप्रतिनिधींच्या वतीने नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनी केली. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना दिले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय वडाळा येथे झाल्यास बाळे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुमारे २२ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागेल. यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. त्याऐवजी बाळे येथे दळणवळणाच्या उत्तम सुविधा, चांगले रस्ते आणि आवश्यक प्रशासकीय पायाभूत सोयी उपलब्ध असल्याने, हे ठिकाण अधिक सोयीचे आणि लोकहिताचे ठरेल.

अप्पर तहसील कार्यालय बाळे येथे सुरू झाल्यास नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि प्रशासकीय कामांसाठी होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या हिताचा सकारात्मक विचार करून या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेवक समाधान आवळे आणि आनंद भवर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.