Balasaheb Thackeray Jayanti: मनसेकडून बाळासाहेबांच्या जयंती निमित्त राज ठाकरेंचा भावनिक व्हिडीओ ट्वीट!

MNS: ह्या मनगटास तूच शिकवली लढण्याची वहिवाट, कोट कोट हृदयांचा केवळ एक हृदयसम्राट !

0

मुंबई,दि.23: मनसेकडून (MNS) बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray Jayanti) जयंती निमित्त राज ठाकरेंचा (Raj Thackeray) भावनिक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भेटीविष्य स्वत: राज ठाकरे सांगतानाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.

भावनिक व्हिडीओ केला शेअर | Balasaheb Thackeray Jayanti

“जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात, राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अखेरचा ‘राज’कीय संवाद !” असं मनसेने ट्वीट केलं आहे.

Balasaheb Thackeray Jayanti
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे

मला मिठी मारली आणि म्हणाले… | Raj Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ट्वीट करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये राज ठाकरे म्हणताना दिसतात की, “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होते, मनोहर जोशी रूमच्या बाहेर गेले आणि ते रूमच्या बाहेर गेल्यावर मला बाळासाहेबांनी बोलावलं, माझ्यासमोर हात पसरले आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं.”

याचबरोबर, “जेव्हा मुलाखतकाराने मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेंचं बंडं आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्यात. हे सगळेजण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलेलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.” असंही राज ठाकरे म्हणले आहेत.”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या यानिमित्त आज दिवसभर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून दोन्ही गटांमधील संघर्षही अद्याप संपलेला नाही. त्यातच आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदतही संपत आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. दरम्यान, सगळ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही गटांकडून बाळासाहेबांची जयंती साजरी केली जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here