Bajrang Dal Activist Murder: हिजाबविरोधी पोस्टमुळे बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

0

बंगळुरू,दि.21:Bajrang Dal Activist Murder: कर्नाटकात (Karnataka) हिजाबवरून (Hijab Controversy) वाद सुरू आहे. शाळा व कॉलेजमध्ये हिजाब घालून येण्यास बंदी आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. उजव्या विचारांच्या अनेक संघटनांनी एकत्र येऊन शाळा आणि कॉलेजात हिजाबवर बंदी आणण्यासाठी मोर्चे आणि आंदोलने केली आहेत. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या हिजाब वादात बजरंग दलाने सक्रीय भूमिका बजावली आहे. हिजाब वादामुळे कर्नाटकात तणावाचं वातावरण असताना एका बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या (Bajrang Dal Activist Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


पण ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली? याची कोणीतीही अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आली नाही. ऐन हिजाबचा वाद शिगेला पोहोचला असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानं शिमोगा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मृत हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत होता. या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



हर्षा असं हत्या झालेल्या 26 वर्षीय कार्यकर्त्याचं नाव आहे. तो कर्नाटकातील शिमोगा परिसरातील रहिवासी होता. रविवारी रात्री नऊच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार चाकुने वार करून त्याची हत्या केली आहे. वार झाल्यानंतर हर्षाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. हिजाबविरोधी पोस्ट केल्याच्या कारणातून हर्षाची हत्या झाल्याचा आरोप काही संघटनांकडून केला जात आहे.

रविवारी सायंकाळी नऊच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांने हर्षावर चाकुने वार केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या हर्षाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण याठिकाणी त्याची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी अधिक माहिती येणं अद्याप बाकी आहे. हिजाब पोस्टमुळेच ही हत्या झाली असल्याची कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली नाही. हत्येच्या नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहनं जाळली आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून 144 कलम लागू करण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here