सोलापूर,दि.१६: सोलापुरातील शेळगी भागात भाजीपाला विक्री करणाऱ्यास मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आरोपी १) सुनील दत्तात्रय ढोणे २) गणेश शिवकुमार गुरूभेटी ३) समर्थ महेश खुब्बा ४)निखिल नागनाथ शालगार ५) अभिजित रमेश जाधव ६) सचिन सिध्दराम दुलंगे ७) प्रशांत राम पवार ८) बनप्पा सिद्राम कोळी ९) बिरप्पा शिरीष पुजारी सर्व रा.शेळगी, सोलापूर यांचा जामीन अर्ज ज्युडिशिएल मँजिस्टेट, सोलापूर (डि.आर.भोला) यांनी मंजूर केला.
यात हकिकत अशी की,दि. 05/03/24 रोजी दुपारचे सुमारास बिराजदार दवाखान्याजवळील चाचा किराणा दुकानाजवळ फिर्यादी आयान मुर्तुज बागवान हा भाजी विकत असताना फिर्यादीचा ओळखीचा समर्थ खुब्बा हा फिर्यादी जवळ आला व त्याने तुझ्याशी काही बोलायचे आहे. तुझा मोबाईल नंबर दे असे म्हणाल्याने फिर्यादीने त्यास त्याचा मोबाईल क्रं. दिला.
तदनंतर फिर्यादी घरी जावुन फ्रेश होऊन बिराजदार दवाखान्यासमोर येऊन बसला. त्या नंतर 15 मिनीटांनी समर्थ खुब्बा हा त्याच्या मित्रासह आला व तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून त्या दोघांनी फिर्यादीस जबदस्तीने मोटार सायकलवर बसवुन बाहेर जावुन बोलु असे म्हणून बार्शी टोलनाक्याचे पुढे घेवुन गेल्यानंतर फिर्यादीस खाली उतरवुन मोकळ्या रानात घेवुन गेले व तु आमच्या गल्लीत भाजी विकायला यायचा नाही, तु गल्लीतील मुलींना का छेडतो असे म्हणुन समर्थ खुब्बा, भाईजी दुलंगे व अनोळखी दोन इसमांनी मिळुन हाताने लाथाबुक्याने मारहाण केली.
समर्थ यांने दांडक्याने भाईजी यांने कंबरपट्याने मारहाण केली व त्याचवेळी समर्थ यांने त्याचे मोबाईलवरुन इतर मित्रांना फोन करुन ठिकाण सांगून बोलावुन घेतले व दरम्यान समर्थ याचे चार ते पाच मित्र तेथे आले सर्वांच्या हातात कोयता, खंजीर अशी घातक हत्यारे होती. त्यावेळी समर्थ याने फिर्यादीचा मोबाईल जबदस्तीने काढुन घेतला साधारण अर्ध्या तासानंतर गणेश नावाच्या इसमांने यासीन यास तेथे घेऊन आला. त्
यावेळी तेथे जमलेल्या आठ ते दहा इसमापैकी एकाने या दोघांना आता सोडायचे नाही असे म्हणून त्या सर्वांनी दोघांना लाथाबुक्याने मारहाण केली व जय श्री राम म्हण असे म्हणण्यास सांगितले. अशा आशयाची फिर्याद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रस्तुत गुन्हयामध्ये पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आले होते तदनंतर आरोपींनी अॅड. संतोष न्हावकर यांच्यामाफत कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपींतर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने सर्व आरोपींना जामिनावर मुक्त केले.
यात आरोपींतर्फे अॅड. संतोष न्हावकर, अॅड. वैष्णवी न्हावकर, अॅड. राहुल रूपनर, अॅड. शैलैश पोटफोडे, अॅड. श्रेयांक मंकणी, अॅड. जयराज नंदुरकर यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. वैशाली बनसोडे यांनी काम पाहिले.