सोलापूर,दि.२२: बलात्काराप्रकरणी न्यायालयाने एकास जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, मौजे भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर येथील रहिवासी सुनिल प्रकाश हत्तरकी याचे विरुध्द लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केले प्रकरणी दि. ११/०४/२०२३ रोजी मंद्रुप पोलीस ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता व त्याप्रकरणी आरोपी सुनिल हत्तरकी यास अटक करण्यात आली होती.
अत्त्याचार प्रकरण एकास जामीन मंजूर
यात फिर्यादीचे असे म्हणणे होते की, आरोपी सुनिल हत्तरकी याच्यासोबत फिर्यादीचे प्रेमसंबंध होते व आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून गोवा येथे पळवून नेले व गोवा येथे फिर्यादीवर तिच्या संमतीशिवाय अत्याचार केला व नंतर फिर्यादी ही लग्नाचा आग्रह करु लागल्यावर आरोपी हा टाळाटाळ करु लागला त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
आरोपीने ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत जामीनाचा अर्ज सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला.
यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, प्रौढ स्त्री व पुरुषामधील शारिरिक संबंध हा प्रत्येक वेळेस बलात्कार म्हणता येणार नाही तसेच फिर्यादीचे सदर आरोपीबरोबर गोव्यास निघून जाणे व तेथे नवरा बायकोप्रमाणे राहणे हि परिस्थिती वेगळाच प्रकार दर्शविते त्यामुळे सदरचा शरीरसंबंध हा संमतीने झालेला असून यास अत्याचाराचे स्वरुप देता येणार नाही. त्यापोटी आरोपीच्यावतीने अनेक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करण्यात आले. तसेच सदर फिर्यादीने तिच्या कुटुंबियांच्या दबावास बळी पडून सदरची फिर्याद दाखल केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सदरील आरोपीस मा. सत्र न्यायालय सोलापूर यांनी रुपये ५०,०००/- च्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचा आदेश पारित केला.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. संतोष आवळे, ॲड. राम शिंदे, ॲड. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.