Bageshwar: बागेश्वर महाराज यांच्याविरोधात दाखल अर्जावर पोलिसांनी घेतला हा निर्णय

Shyam Manav: अंनिसकडून दाखल करण्यात आला होता अर्ज

0

नागपूर,दि.25: Bageshwar: बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज (Dhirendra Krishna Shastri) सध्या देशपातळीवर चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून धीरेंद्र कृष्ण महाराज यांना चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे. एवढंच नाहीतर बागेश्वर धाम महाराजाला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा मिळत आहे. पण आता बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना नागपूर पोलिसांची क्लीन चिट दिली आहे.

दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप | Bageshwar

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात यांच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखल केलेला अर्ज नागपूर पोलिसांकडून दप्तरी दाखल केला होता.

पोलिसांचा निष्कर्ष | Dhirendra Krishna Shastri

नागपूर पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण यांचे व्हिडिओ तपासले असता त्यामध्ये अंधश्रद्धा पसरविण्याविरोधात काहीही बोलले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे.

काय होता अंनिसचा आक्षेप | Shyam Manav

श्याम मानव म्हणाले, “9 जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिलं. हे महाराज दावा करतात की, ते भक्तांचं नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात. याशिवाय धीरेंद्र महाराज कोणत्याही भक्ताच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवली हेही सांगण्याचा दावा करतात. या दाव्यातील पहिल्या भागाला टेलिपथी आणि इंट्युशन म्हणतात. तसेच घरात जाऊन काहीही पाहू शकण्याच्या क्षमतेला अंतर्ज्ञान किंवा दिव्यशक्ती (क्लेरोयान्स) म्हणतात. मी दैवीशक्तीला कोणतंही आव्हान दिलं नाही, तर महाराजांच्या दिव्यशक्तीला आव्हान दिलं आहे,” अशी माहिती श्याम मानव यांनी दिली.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना धमकी

दरम्यान, जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शास्त्री म्हणाले की, ते सनातन धर्माचे अनुयायी आहेत. सनातन धर्माचे अनुयायी अशा धमक्यांना घाबरत नाहीत. चमत्कारावरुन वादात सापडलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री पहिल्यांदाच बागेश्वर धाम येथे पोहचले.

धीरेंद्र शास्त्री यांनी पाकिस्तानबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, जो देश इतरांना नष्ट करण्यात आपली शक्ती खर्च करतो तो देश नष्ट होतो. पाकिस्तानचे भारतात लवकरच विलीनीकरण झाले पाहिजे, त्यांच्याकडे हाच मार्ग शिल्लक आहे.’

याआधीही बागेश्वर धामच्या महाराजांना फोनवरून धमक्या दिल्याची बातमी आली होती. याबाबत छतरपूर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. धमक्यांची तक्रार धीरेंद्र शास्त्री यांचे नातेवाईक लोकेश गर्ग यांनी पोलिसांत दाखल केली आहे. या प्रकरणी बामिठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here