Bachchu Kadu On Ajit Pawar: चार पाच आमदारांचा उल्लेख करत बच्चू कडू यांचं मोठं विधान “अजित पवारांकडे…”

0

मुंबई,दि.१२: Bachchu Kadu On Ajit Pawar: चार-पाच आमदारांचा उल्लेख करत बच्चू कडू यांनी मोठं विधान केले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्यावर आरोप करत शिंदे गटाने बंडखोरी केली. मात्र, आता त्यांना पुन्हा ज्यांच्यावर आरोप केले त्याच अजित पवार यांच्याबरोबर सत्तेचं वाटप करावं लागत आहे. अशातच अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर बोलताना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी अजित पवारांना मिळणारं मंत्रीपद आणि आमदारांची नाराजी यावर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले बच्चू कडू? | Bachchu Kadu On Ajit Pawar

बच्चू कडू म्हणाले, “खातेवाटपामध्ये काही गोष्टींमध्ये किंतू परंतू असू शकतो. प्रत्येकाला वाटतं की, अजित पवारांकडे अर्थखातं जायला नको. मागच्यावेळी अजित पवारांनी जो कारनामा केला, तर ते यावेळी होऊ नये अशी अपेक्षा आहे. तसं पुन्हा यावेळी होईल की काय अशी आमदारांना भीती आहे.”

प्रत्येक आमदाराला असं वाटतं… | Bachchu Kadu On Ajit Pawar

“प्रत्येक आमदाराला असं वाटतं आणि त्यातील चार-पाच आमदार मलाही म्हणाले की, अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खातं गेलं, तर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त निधी देणे, इतरांना कमी देणे हाच प्रकार करतील. म्हणून सर्वांना वाटतं की, अर्थखातं अजित पवारांना देऊ नये,” असा दावा बच्चू कडूंनी केला.

“आमदारांची नाराजी दूर करणं हे सरकारपुढे मोठं आव्हान आहे. कारण तिसरा पक्ष सरकारमध्ये आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदं गेली आहेत. त्यामुळे आधीच अपेक्षा असलेल्यांना वाटतं की, आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथं आला. त्यामुळे आपली संधी जाते की काय अशी नाराजी असणारच आहे,” असंही बच्चू कडूंनी नमुद केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here