नागपूर,दि.26: आमदार बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्याबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास, आपण मोठा धमाका करु असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुकतेच अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी माझ्या संपर्कात सात ते आठ आमदार असल्याचे सांगत आणखी ट्वीस्ट वाढवला आहे.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, सरकारच्या बाहेरुन विरोधक आरोप करत आहे. हे सुरुवातीपासूनच सुरु आहे. मात्र घरातला माणूस आरोप करतो तेव्हा फार वाईट वाटते. विना पक्षाचा आणि विना पैशाने मी लोकांमधून निवडून आलोय. त्यामुळे लोकांच्या मदतांचा आदर प्रत्येकाने करावा. आमदार रवी राणा यांनी कोणाच्या भरवशावर आरोप केले आहे. हे समोर आले पाहीजे, असंही बच्चू कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले की, राज्यातील सरकार स्थापनेचे सत्ता नाट्य सर्वांनी बघितले. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. मात्र जर माझ्यावर आरोप होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावरील भ्रष्टाचाराचे केले आरोपाचे पुरावे सादर केले नाही तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचेही यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले.
आमदार संपर्कात