Bacchu Kadu: राज्यसभेच्या निवडणूक निकालावरून बच्चू कडूंचे शरद पवारांबद्दल मोठं विधानं

0

मुंबई,दि.12: राज्यसभेच्या निवडणूक निकालावरून मंत्री बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) मोठं विधानं केलं आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांपैकी भाजपाने (BJP) तीन जागांवर विजय मिळवला. अटीतटीच्या लढतीत राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपाने विजय मिळवला. सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडिक (Dhananajay Mahadik) आणि शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांच्यात अटीतटीची लढत झाली.

अटीतटीच्या लढतीत संजय पवार यांचा पराभव झाला. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणुकीत दगाबाजी करणाऱ्यांची नावे जाहीर केली. अपक्ष आमदारांवर जास्त बोली लावली असेल असे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा चमत्कार मान्य करावा लागेल असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. राज्यसभेच्या निवडणूक निकालावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

भाजपाला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झाले आहे. यामध्ये वेगळे काही नाही. मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे,” असेही शरद पवार म्हणाले.

संजय राऊतांनी अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांच्यावर पराभवाचे खापर फोडले. यावर ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी राऊतांसह महाविकास आघाडीतील पक्षांवर खापर फोडले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने आपापल्या उमेदवारांना जास्तीची मते टाकून सुरक्षित करण्याच्या नादात मविआचा गेम बिघडवला त्यामुळे हा पराभव झाला. सरसकट अपक्षांना बदनाम करून चालणार नाही. काही अपक्ष मविआसोबतच होते, असे सुनावत अमरावती जिल्ह्यातील एक अपक्ष आमदार जो सरकारसोबत आहे, तो या घोडेबाजारात सहभागी होता, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.   

मविआला सहाव्या जागेसाठी आठ ते नऊ मते कमी पडली. संजय  राऊतांसाठी 41 मतांची बेगमी करून शिवसेनेने रिस्क घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने तसे केले नाही. तसेच ज्या आमदारांचे सदस्यत्व कायम आहे, त्यांना तुरुंगात असल्याने मतदानाचा अधिकार नाही हा न्यायालयाचा निकाल अनाकलनीय आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शरद पवारांच्या मनात काय आहे?

जसा तुमच्या पक्षाच्या आमदारांवर दबाव आहे तसाच अपक्षांवरही असू शकतो. घोडेबाजार किंवा ईडी, सीबीआय काहीही. यामुळे कोणालाही पराभवासाठी जबाबदार ठरविण्यापेक्षा त्यांना समजून घ्यायला हवे. पक्षांनी रिस्क घेतली असता तर आज चित्र वेगळे असले असते. विधान परिषदेत हे चित्र बदलू शकते, असे सांगतानाच एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल मात्र शरद पवारांच्या मनात काय आहे, हे सांगता येणार नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या केलेल्या कौतुकामध्ये एक वेगळा डाव असू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here