Bacchu Kadu On ZEE 24 TAAS: “भाजपचा एकही माणूस घोटाळे करत नाही का” बच्चू कडू

0

मुंबई,दि.25: Bacchu Kadu On ZEE 24 TAAS: प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संस्‍थापक आमदार बच्‍चू कडू (Bacchu Kadu) यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाजपावर टीका केली आहे. भाजपाच्या धोरणांवर कडू यांनी मुलाखतीत टीका केली आहे. ईडीच्या दुरूपयोगावरून बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. बच्चू कडू ‘झी 24 तास’च्या ‘टू द पॉईंट’ मुलाखतीत म्हणाले की, ‘पैसा आहे, सत्ता आहे म्हणून अतिरेक करु नका.’ 

भाजपचा एकही माणूस घोटाळे करत नाही का? | Bacchu Kadu On ZEE 24 TAAS

“महायुतीला देशभरात सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागतील. ईडीमध्ये एकाच पक्षाची माणसं का दिसतात. भाजपचा एकही माणूस घोटाळे करत नाही का?” असा प्रश्नही बच्चू कडू यांनी उपस्थित केला. 

बच्चू कडू यांनी राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहे. लहान पक्षांना घेऊन राज्यात तिसरी आघाडी करण्याचे संकेत मिळत आहेत.  

View this post on Instagram

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

‘झी 24 तास’च्या ‘टू द पॉईंट’ मुलाखतीत बच्चू कडू यांना तुम्ही पोलिसांच्या पाया पडताय, असा एक व्हिडीओ आला होता, असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, “आता लोकशाही आहे. कसं आहे तुम्हाला सांगतो, पोलीस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असतील. आमच्याकडे परवानगी होती, सर्व काही होतं. उद्या सभा आहे आणि आज आम्हाला परवानगी नाकारतात हा अतिरेक आहे. असा प्रकार मुघल काळातही फार कमी होत होता.” 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here