Bacchu Kadu On Accident: अपघाताबद्दल आमदार बच्चू कडू यांनी केला मोठा खुलासा

Bacchu Kadu On Accident: अपघातानंतर घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत होती

0

मुंबई, दि.23: Bacchu Kadu On Accident: आमदार बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला होता. त्यांना अमरावतीच्या (Amravati) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाली होती. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या डोक्याला चार टाके पडले होते. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली. यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला होता.

या अपघातानंतर हा अपघात नाही तर घातपात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांवर आता स्वत: बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा Teacher Dance Video: शिक्षिका झाली आऊट ऑफ कंट्रोल, केला जबरदस्त डान्स

त्यामुळे हा अपघात झाला… | Bacchu Kadu On Accident

अपघात की घातपात या चर्चांवर आमदार कडू यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘ हा अपघात आहे, अतिशय कमी जागा होती, त्यामुळे हा अपघात झाला. यात कोणताही घातपात झालेला नाही. त्याची बाईक वेगाने नव्हती, मी टर्न झाल्यामुळे हा अपघात झाला, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.

…हे चुकीच होते | Bacchu Kadu

‘माझी प्रतिक्रिया न घेता या चर्चा सुरू होत्या हे चुकीच होते. ज्याचा अपघात झाला त्यांना तर विचारायला हवे होते. कोणत्याही गोष्टीचे राजकारण करावे पण शहानिशा करुन करायला हवे होते, चुकीचा पायंडा पडू नये असं मला वाटते, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. 

काही दिवसांपूर्वी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेले गोरे यांच्यावर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले, त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांचाही अपघात झाला. त्यात मुंडे यांच्या छातीला मार लागल्याने ते देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते, त्यांनाही आता रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. तर रायगडच्या कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने धडक दिली होती. या धडकेत कदम यांच्या वाहनाचा मागील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने योगेश कदम यांना अपघातात दुखापत झाली नाही. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here