Bacchu Kadu Fine: आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने ठोठावला 5 हजार रुपयांचा दंड

0

उस्मानाबाद,दि.21: Bacchu Kadu Fine: प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu Fine) यांना न्यायालयाने 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना उस्मानाबाद न्यायालयाने (Osmanabad Court) 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बच्चू कडू यांच्यासह अन्य तीन आरोपींना देखील दंड ठोठावला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आंदोलनादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर कडू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

14 जानेवारी 2019 पासून प्रकरण प्रलंबित असल्याने उस्मानाबाद कोर्टाने बच्चू कडू यांना खडे बोल सुनावले आहेत. यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याची तंबी देखील जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली आहे. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते.

याआधी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी मंत्रालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना नियमित जामीन मंजूर केला होता. साल 2018 मध्ये केलेल्या एका राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्यात त्यांना गिरगाव दंडाधिकारी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र त्याच दिवशी तातडीने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत बच्चू कडू यांनी ताप्तुरता जामीन मिळवला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी रितसर नियमित जामीनासाठीही अर्ज केला होता. ज्यावर सुनावणी घेत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 21 सप्टेंबर रोजी या प्रकरणात कडू यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यासह तितक्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला. तसंच तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देत कोणत्याही साक्षी पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे आदेशही दिले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here