Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

0

ठाणे,दि.२६: Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अविनाश जाधव हे मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत. मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अविनाश जाधव यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणातल्या धमकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले असुन या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Death threat to MNS leader Avinash Jadhav)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मशिद, मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम आणि सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उद्ध्वस्त केले होते. तर दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी, मुंब्रा येथील डोंगरात वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणून प्रशासनाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. याचे पडसाद उमटताच जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली असतानाच काहींनी याविरोधात एकवटण्यास सुरुवात केली.

अविनाश जाधव यांना धमकी | Avinash Jadhav

अविनाश जाधव यांनी मुंब्रा अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर ” हम उसे जिंदा नही छोडेंगे … कोई गुस्ताख छुप न पाएगा … हम उसे ढुंड ढुंढ के मारेंगे … ” अशा आशयाचा व्हीडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. एस आर कमिटी … बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हिडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले असून मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here