औरंगाबाद शहरातल्या पत्नी पीडित संघटनेची मागणी मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा

Aurangabad News | पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी

0

औरंगाबाद,दि.7: पत्नी पीडित संघटना | औरंगाबाद (Aurangabad News) शहरातल्या पत्नी पीडित संघटनेनी मागणी मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. सीमावादावरून महाराष्ट्रातील वातावरण चिघळले आहे. सोलापूर जिल्ह्यातील उडगी गावाने मूलभूत सुविधा न मिळाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. जत तालुक्यातील 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा इशारा दिला आहे. अशातच आता औरंगाबाद शहरातील पत्नी पीडित संघटनेनेही कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.

औरंगाबाद | पत्नी पीडित संघटनेची काय आहे मागणी?

‘महिलांप्रमाणे पुरुषांवरही अत्याचार होतात. या प्रकरणांच्या घटनांमध्ये आता वाढ झालीय. महिलांवर अत्याचार झाला तर त्यांना महिला आयोगाकडे दाद मागता येते. पुरुषांना असा कोणाताही पर्याय नाही. त्यांना समाज समजून घेत नाही. समाजाच्या दुर्लक्षामुळे पुरुषांवरील अन्याय वाढतोय. गेल्या 7 वर्षांमध्ये 10 हजार 763 पत्नी पीडित पुरुष आमच्या संघटनेत सहभागी झाले आहेत.

Aurangabad News | पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी

पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला आळा बसण्यासाठी पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी आम्ही वारंवार केली आहे. ही मागणी एका महिन्याच्या आत मान्य झाली नाही तर आम्ही कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे,’ असा इशारा पत्नी पीडित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे यांनी दिला आहे.

पत्नी पीडित संघटनेकडून केली जाते कायदेशीर मदत

औरंगाबादच्या भारत फुलारे यांनी पत्नी पीडित पुरुषांसाठी ही संघटना स्थापन केली आहे. पत्नीकडून छळ सहन करणारा पीडित पती संघटनेचा सभासद होऊ शकतो. या सदस्यांना संघटनेकडून कायदेशीर मदत केली जाते. पत्नीकडून होणाऱ्या अन्यायाकडं लक्ष वेधण्यासाठी या संघटनेकडून वट सावित्रीच्या एक दिवस आगोदर पिंपळाला 108 उलट्या फेऱ्या मारल्या जातात. तसंच पुरुष दिनाला कावळ्याची पूजा केली जाते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here