Cruise drug case: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी व्हाट्सॲप चॅट नंतर उघड केले ऑडिओ क्लिप्स 

0

मुंबई,दि.16: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. WhatsApp चॅट उघड करत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज (दि.16) क्रूझ ड्रग पार्टी कारवाई प्रकरणी गंभीर आरोप केले होते. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन (Mumbai Cruise drug case) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी आज आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के पी गोसावी याचे एका अज्ञात व्यक्तीशी मोबाईलवर झालेले संभाषण ट्विट केले आहे. या संभाषणाच्या क्लिप्समुळे पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता आहे. 

नवाब मलिकांच्या या नव्या खळबळजनक गौप्यस्फोटानं या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी के पी गोसावी च्या ४ ऑडिओ क्लिप्स ट्विटरवरून पोस्ट केल्या आहेत. 

मुंबईतील समुद्रात आयोजित क्रूझ पार्टीवर कारवाई करण्यासंदर्भातील काही चॅट्स आणि ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी उघड केले आहेत. यातील एका ऑडिओ क्लिपमध्ये के पी गोसावी हा ऑफिशियल असा उल्लेख करत असल्याचं समोर आलं आहे. क्रूझवरील पार्टीत ठराविक व्यक्तींनाच टार्गेट करण्यासंदर्भात के पी गोसावी एका व्यक्तीसोबत चॅट्सवर बोलत असल्याचं दिसून येत आहे. “केपी गोसावी आणि माहिती देणारा व्यक्ती कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीत ठराविक लोकांना अडकवण्यासाठीचं प्लानिंग करत असल्याचं या व्हॉट्सॲप चॅटमधून उघड होत आहे. तर के पी गोसावी हा एनसीबी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं अज्ञात व्यक्तीला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. या ४ ऑडिओ क्लिपबाबत नवाब मलिक यांनी माहिती देत के पी गोसावीचे हे संभाषण असल्याचं नमूद केले आहे. 

पहिली ऑडीओ क्लिप

के पी गोसावी – जस्ट कलेक्ट द डेटा अलोंग विथ कॉन्टॅक्ट डिटेल्स, इसके बाद में आपण मोबाईल से ही ट्रेस करलेंगे! कोई दिक्कत नाही हैं. बट डोन्ट डिस्कस अपार्ट फ्रॉम मी बिकॉज आय एम डायरेक्टली टू द ऑफिशियल   

दुसरी ऑडिओ क्लिप

के पी गोसावी – कबीर का…. कबीर के पास कन्फर्म होगा क्या! मुझे कन्फर्म जिनके पास होगा १० मे से ५ तोभी कन्फर्म चाहिए आ, उनके पास निकलना चाहिए.  

तिसरी ऑडिओ क्लिप

के पी गोसावी – दादा! दिल्ली का मेसेज डालना है तो अभी डाल दो हां! बाद मे दिल्ली बंद हो जायेगा फार कल तक चला जायेगा. 

चौथी ऑडिओ क्लिप

के पी गोसावी – भाई जाने दे अभी सब लोक थक गये हैं! पुरा स्टाफ थक गया हैं और मै भी कल से सोया नाही हूं! मेरी भी हालत खराब हैं एव्हरीबडी इज टायर्ड  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here