शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड

0

मुंबई,दि .9: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) काल आंदोलन केले. आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी चप्पल व दगडफेक केली. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्ने सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 100 हून अधिक जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला करण्यापूर्वी चौघांनी सिल्वर ओक येथे रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे.

शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओक येथे हल्ला करण्याआधी 4 जण येवून गेले होते त्यांनी रेकी केली असावी असा संशय मुंबई पोलिसांना आहे. या चारही जणांना रात्री अटक करण्यात आली आहे. त्यांना देखील आज कोर्टात हजर करण्यात आले.

पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी धुडगूस घातला होता.

8 तारखेला दुपारी 3 वाजता आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार आहेत हे पोलिसांना कळाले होते. पण 7 तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी भाषणात सिल्व्हर ओक येथे जाण्याचा उल्लेख केला होता. तेव्हाच आझाद मैदान येथे जे पोलिस उपस्थित होते त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती तरी देखील शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला गेला नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here