सोलापूर,दि.14: सोलापूर शहरातील जुना बिडी घरकुल येथील राहणारी मुलगी अंकिता गोगुल ही दहावी उत्तीर्ण झाली आहे. परंतु तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याकारणाने ती शिक्षण घेऊ शकत नव्हती. केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने ती शिक्षणापासून वंचित राहणार होती.
सोलापुरातील आस्था रोटी बँकेने या मुलीची हकीकत ऐकून समाजातील व्यक्तींना आव्हान केले होते. त्यानंतर समाजातून आस्था रोटी बँकेचे आव्हानाला चांगले प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. समाजातील एका चांगल्या दानशूर व्यक्तीने या मुलीला मदत करण्याचे तसेच शिक्षणासाठी सर्व मदत देण्याचे आश्वासन आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे यांना दिले.
परंतु या दानशूर व्यक्तीने विजय छंचुरे यांना अट घातली की माझे नाव कोणत्याही परिस्थितीत सोशल मीडिया, व वर्तमानपत्र कोठेही येता कामा नये. हे मान्य केल्यानंतर त्यांनी मदतीचे घोषणा करत मदत केली.
यावेळी मदत देताना आस्था रोटी बँकेचे कांचन हिरेमठ, नीलिमा हिरेमठ, राहुल कुरकुट, विजय छंचुरे व गोगूल कुटुंबाकडून त्या मदत करणारे दानशूर व्यक्तीचे व आस्था रोटी बँकेचे ही आभार मानण्यात आले.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करत आहेत.