दि.१०: Assembly Elections Results 2022: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections 2022) मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा पूर्ण बहुमताच्या जोरावर पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचे दिसून येत आहे. तर पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पार्टी (AAP) पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. दरम्यान, पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने (AAP) मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये एकुण ११७ जागांपैकी आप ९०, काँग्रेस १८, अकाली दल ०६ आणि अन्य १ ठिकाणी आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांवरून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे.
पंजाबमधील काँग्रेसच्या दारुन पराभवानंतर काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. लोकांचा आवाज, हा देवांचा आवाज आहे. पंजाबच्या जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारला आहे, असं म्हणत सिद्धू यांनी ‘आप’चे अभिनंदनही केलं आहे.
पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांवरून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. दिल्लीत आतापर्यंत जी आश्वासनं दिली ती अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण केलं. आता तेच भगवंत मान दिल्लीत पूर्ण करतील. हा विजय आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे, असं आपचे नेते जरनेल सिंग यांनी सांगितलं.
आम्ही कायमच एक पूर्ण राज्याबाबत बोलत होतो. जे आज आम्हाला मिळालं आहे. आम्ही त्या ठिकाणी आमचं प्रशासन दाखवून देऊ,” असं आपचे नेते जरनेल सिंग यांनी व्यक्त केलं. तसेच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पंजाबमधील विजयावर पंजाबच्या जनतेचे अभिनंदन केलं आहे.