दि.26: ट्रेन खरेदी करण्यासाठी 300 कोटींचे कर्ज (लोन) मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अनेकांना कर्ज संदर्भात फोन येतात. सारखे सारखे येणाऱ्या फोनमुळे अनेकजण कंटाळतात. वारंवार येणाऱ्या मार्केटिंग कॉलमुळे अनेकजण वैतागतात. मात्र दुसरीकडे अनेक ग्राहक बँकांकडील कर्मचाऱ्यांची चांगलीच शाळा घेतात. याच्याशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही हसणं रोखू शकणार नाही.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. लोनशी संबंधित फोन तर तुम्हाला अनेकदा येत असतील. आता लोनशी संबंधित हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही हैराण व्हाल.
Who wants a loan?? pic.twitter.com/SnkjTCbRP6
— Manjeet Bagga (@Goldenthrust) October 24, 2021
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती फोनवर बोलत आहे. ज्यात तो लोन घेण्याबद्दल बोलत आहे. मात्र ज्या गोष्टीसाठी लोन मागत आहे, ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. ती व्यक्ती ट्रेन खरेदी करण्यासाठी 300 कोटी रुपयांच्या लोनची मागणी करीत आहे.
जे ऐकल्यानंतर फोनवरील मुलीलाही धक्काच बसला. यानंतर ही ती त्यांना अनेक प्रश्न विचारले. या व्यक्तीच्या शेजारी बसलेली महिला गालात हसताना दिसत आहे. हे सर्व संभाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.