दि.5: Aseefa Bhutto Zardari: पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) नेत्या असिफा भुट्टो झरदारी (Aseefa Bhutto Zardari) शुक्रवारी पंजाबमधील खानवाल जिल्ह्यात पक्षाच्या लाँग मार्च दरम्यान ड्रोन कॅमेरा धडकल्याने जखमी झाल्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असीफाला तिच्या उजव्या डोळ्याच्या अगदी वर जखमा झाल्या आहेत आणि पॅरामेडिक स्टाफने तिला उपचारासाठी मुलतानला हलवण्याची सूचना केली.
पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पक्षाच्या अवामी मार्चसाठी बांधलेल्या कंटेनरवर पीपीपी नेत्यासोबत तिचा भाऊ आणि पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाकिस्तानच्या खानेवाल भागात पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते विरोध प्रदर्शन करत होते. याच दरम्यान मीडियाचे काही ड्रोनही हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी हवेत घोंघावत होते. याच दरम्यान एक ड्रोन अचानक असिफा भुट्टो यांच्यावर आदळला. या घटनेमुळे पीपीपी नेत्यांचा मोठा गोंधळ उडाला परंतु, लगेचच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
बिलावलने मोर्चातील सहभागींना संबोधित करताना, ड्रोनच्या धडकेने त्यांची बहीण जखमी झाल्याची पुष्टी केली. घटनास्थळी उपलब्ध असलेल्या पॅरामेडिक कर्मचाऱ्यांनी तिला टाके घालण्याची गरज असल्याचे सुचवले परंतु असिफाने रुग्णालयात नेण्यास नकार दिला आणि रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांना तिच्यावर फक्त मलमपट्टी करून उपचार करण्यास सांगितले, अशी माहिती पीपीपी प्रमुखांनी दिली.
असीफाची मोठी बहीण बख्तावरने नंतर डोळ्यावर पट्टी बांधलेला तिचा नवीनतम फोटो शेअर केला. फोटोमध्ये, असीफा पार्टीच्या कंटेनरभोवती असलेल्या लोकांना हसत हात करताना दिसत आहे.